ज्या भूमीला बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा स्पर्श, त्याच ठिकाणी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
संत गाडगे महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या ठिकाणी शिबिराचे आयोजन


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी) : समता सैनिक दलाच्या पंढरपूर शाखेच्या वतीने आंबेडकर नगर येथील गौतम विद्यालयात आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात आले. शिबिराची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना महिला समता सैनिक निर्मला आठवले, सैनिक कविता भोसले, सुवर्णा भोसले, पुष्पा काटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ अर्पण करून, व भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष जितेंद्र आठवले , महार रेजिमेंट निवृत्त मेजर जनरल अॅड. अनिल कांबळे आणि मेजर यशवंत साबळे, मच्छिंद्र जगताप,यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या ध्वजारोहनाला सलामी देऊन झाली.
समता सैनिक दलाच्या कार्यपद्धती, शिस्त, संघटन, समाजामध्ये समता प्रस्थापित करणे, आणि सामाजिक बांधिलकी याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.
पहिल्या शिबिर सत्रामध्ये परेड,विविध प्रकारचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले. दुसऱ्या सत्रामध्ये समता सैनिक दलाची आचारसंहिता, बौद्धिक कार्यक्रम, लाठी काठी सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण,घेण्यात आले, या समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरामध्ये, करमाळा, माळशिरस ,पंढरपूर, सांगोला, माढा, 120 सैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष आयु. जितेंद्र आठवले यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षक म्हणून महार रेजिमेंट निवृत्त मेजर जनरल अॅड. अनिल कांबळे आणि मेजर यशवंत साबळे, केंद्रीय शिक्षक यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पंढरपूर शाखा, जिल्हा सोलापूर (पश्चिम) तसेच पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला आणि करमाळा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष समाधान जाधव, प्रमोद वनसाळे ,हनुमंत बंगाळे,मोहन गौडदौरू, अविकांत चंदनशिवे,सुनील वाघमारे( अध्यक्ष,फुले शाहू आंबेडकर विचारमंच )आकाश वाघमारे, दत्ता सरवदे, नरेंद्र सरवदे, सर चिटणीस बाळासाहेब गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश लोंढे, राजेंद्र सर्व गोड, शहराध्यक्ष राहुल सर्वगोड, जोशाबा टाइम्सचे संपादक श्रीकांत कसबे, सैनिक आकाश शेळके, दिनेश धनवडे, बाबासाहेब प्रक्षाळे, सागर शेजाळ, दत्ता भोसले, नितीन साळवे, सैनिक अमर शेंबडे,शिबिरास समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व व महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता सैनिक दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी समाजामध्ये समता ,बंधुता ,न्याय,शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या शिबिराची समता सैनिका च्या ध्वजारोहणाला जनरल सलामी देऊन ध्वजारोहण खाली उतरून शपथ ग्रहण करून सांगता झाली.




