श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या वतीने सभासद, ऊस पुरवठादार व कामगारांना गुढीपाडवा सणानिमित्त साखर विक्री सुरू


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
वेणुनगर, दि.४ – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढीपाडवा सणानिमित्त सर्व सभासदांना व सन २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या सर्व ऊस पुरवठादार व कामगारांना २५ किलो पॅकींगमध्ये रुपये ३०/- प्रती किलो या दराप्रमाणे २५ किलो साखर प्रति सभासद, ऊसपुरवठादार व कामगार यांना याप्रमाणे साखर वाटपाचे धोरण आमदार मा.श्री. अभिजित आबा पाटील चेअरमन यांचे मार्गदर्शनानुसार मा. संचालक मंडळाने जाहीर केलेले आहे. त्याप्रमाणे बुधवार दि.०४.०३.२०२६ पासून ते ३१.०३.२०२६ पर्यंत कारखाना साईटवर विठ्ठल कॅन्टींन शेजारी व पंढरपूर शहरामध्ये समृध्दी ट्रॅक्टर शोरुम, कॉलेज रोड, पंढरपूर येथे वाटप चालू राहील. तसेच मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस व सांगोला येथील ऊस पुरवठादार यांनी पंढरपूर येथील साखर वाटप केंद्रातून साखर कुपनवरती नमुद केलेल्या मुदतीमध्ये साखर घेवून जावी. तसेच माढा, करमाळा, बार्शी व परांडा गेटकेन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसाठी ०१) माढा विभाग शेटफळ रोड, माढा, ०२) करमाळा व टेंभुर्णी विभाग : शिवसंकल्प गौरी प्लाझा, हॉटेल सुमित समोर, टेंभुर्णी, ०३) लऊळ विभाग मौजे लऊळ गट ऑफिस, पंढरपूर-कुडूवाडी रोडवर, लऊळ येथे साखर वाटप केंद्र चालु केलेले असून सदर केंद्रातील साखर वाटप दि.०५.०३.२०२६ ते १८.०३.२०२६ पर्यंत साखर चालु राहिल.
वरील साखर वाटप केंद्र हे सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० व दुपारी १.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये चालू राहतील. तसेच सध्या कारखान्याचा ऑफ सिझन चालू असल्यामुळे दर शनिवार, रविवार या दिवशी सुट्टी असल्याने व इतर जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या दिवशीही साखर दुकान बंद राहील,
पंढरपूर येथील साखर वाटपाच्या केंद्राचे उद्घाटन श्री विठ्ठल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक श्री दिनकर दाजी चव्हाण, श्री संत मुक्ताबाई मठाचे व्यवस्थापक श्री शशिकांत पाटील, वास्तुशिल्प चे मालक व निशीगंधा बँकेचे चेअरमन श्री आर.बी. जाधव, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री विश्वंभर काशिद, श्री आनंदबापु पाटील, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व गजानन मेडिकलचे मालक श्री गजाननबापू बागल यांचे शुभहस्ते करण्यात आले. तसेच कारखाना साईटवरील साखर वाटप केंद्राचे उद्घाटन संचालक श्री प्रविण कोळेकर व श्री सिध्देश्वर बंडगर, वर्क्स मॅनेजर श्री यु.के. तावरे, चिफ केमिस्ट श्री बी. आर. माने, लिगल ऑफिसर श्री ओ. जे. अवधुत, चिफ अकौंटंट श्री ओ.एस. शिंदे, शुगर सेल अधिकारी श्री महेश घाडगे, हेड टाईम किपर श्री एस.एस. जगताप व इतर अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे, सर्व सभासद, ऊसपुरवठादार, ठेकेदार, अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते. तरी सर्व सभासद यांना विनंती की, कुपनाशिवाय साखर मिळणार नाही व कुपनावरती नमुद केलेल्या मुदतीमध्ये साखर घेऊन जावे.


