आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत कर्मवीर महाविद्यालयाचा दमदार विजय
लक्ष्मी मानेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.महाविद्यालयाची ५५ किलो वजन गटातील खेळाडू लक्ष्मी माने (बी.सी.ए. द्वितीय वर्ष) हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावला. आपल्या जिद्द, चिकाटी आणि अचूक तंत्राच्या जोरावर तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णयश मिळवले. तिच्या या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर तिची अखिल भारतीयआंतर विद्यापीठ राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हीबाब महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची ठरली आहे.
तसेच अतुल चव्हाण (बी.ए. द्वितीय वर्ष) यांनीही उत्कृष्ट लढत देत रौप्य पदक मिळवले आहे. त्याने महाविद्यालयाचा गौरव वाढवला.त्यांच्या संयमी व आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे स्पर्धेत त्याची विशेष छाप पडली.या दोन्ही खेळाडूंच्या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचेवातावरण निर्माण झाले असून प्राचार्य डॉ. बी. टी.जाधव, उपप्राचार्य डॉ भगवान नाईकनवरे, डॉ. राजेश कवडे, डॉ. सुशील शिंदे, विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, क्रीडा विभागप्रमुख प्रा.अनिल परमार, प्रा.विठ्ठल फुले, प्रा.मनोज खपाले, व सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कठोर परिश्रमाला आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला या यशाचे श्रेय दिले जात आहे.
या उल्लेखनीय यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रेरणामिळणार असून भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायमराहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




