Uncategorized

सौ. सविता रवि सोनार यांचा एक्कावन्न पूर्ती सोहळा संपन्न….

सौ.

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे 

पंढरपूर (प्रतिनिधी) :- येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता रवि सोनार यांचा एक्कावन्न पूर्ती सोहळा पंढरपूर आणि परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदारपणे संपन्न झाला. वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर सौ. प्रमिलाताई धनाजीराव देशमुख, सौ. माधुरीताई प्रतापसिंह चव्हाण आणि सौ. अंजलीताई सचिनराव लादे या मान्यवर महिला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सर्व मान्यवरांनी सौ. सविता सोनार यांच्या एक्कावन्न पूर्ती निमित्त पुष्पगुच्छ, महावस्त्र, पुष्पहार आणि पुस्तकसंच देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी कवी रवि सोनार यांच्या स्त्री सन्मानाचा भाव याविषयी भरभरून कौतुक केले. अधिकाधिक व्यक्तींनी कवी रवि सोनार यांच्याप्रमाणे पत्नीचा सन्मान व गौरव करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
पंढरपूर येथील राधाकृष्ण हॉटेलच्या भव्य सभागृहात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झालेल्या या सोहळ्यात कु. रेवती रवि सोनार हिने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तर कवी रवि वसंत सोनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रस्ताविकामध्ये कवी सोनार यांनी सौ. सविता रवि सोनार यांच्या विषयी मार्मिक भावपत्राचे वाचन केले. हे अनुभवसंपन्न व आशयसंपन्न भावपत्र ऐकून उपस्थित सर्व मान्यवर भावुक झाले. तसेच कवी रवि सोनार यांनी यावेळी ‘सखीचा मी राघू’ ही कविता सादर करून सभागृहात सर्वांना मंत्रमुग्ध केले.
अत्यंत आगळ्यावेगळ्या ठरलेल्या या एक्कावन्न पूर्ती सोहळ्याचे अतिशय सूत्रबद्ध व प्रभावी सूत्रसंचालन डॉ. मैत्रेयी केसकर यांनी केले. कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने यशस्वी करण्यासाठी डॉ. सचीन लादे, प्रतापसिंह चव्हाण, मंदार केसकर, सुनील कोरे, प्रशांत पाटील, प्रवीण देशपांडे, सुनील जगताप, ज्ञानेश्वर मोरे, संजय कुलकर्णी, गजानन साळुंखे, सचीन कदम, मयूर नाईक – पवार, चैतन्य अभंगराव, प्रथमेश जाधव, दिग्विजय पाटील, संदेश सोनार, रोहीत सोनार, गौरव सोनार व ओंकार सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले. या एक्कावन्न पूर्ती सोहळ्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यामधून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, विधीज्ञ, कृषी, साहित्यिक, उद्योग, कला, क्रीडा या व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कवी रवि सोनार यांनी त्यांच्या सौभाग्यवतीचा एक्कावनावा वाढदिवस अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा केल्यामुळे पंढरपूर आणि पंचक्रोशीत विशेष कौतुक व आनंद व्यक्त होत आहे. एक्कावन्न पूर्ती सोहळ्याच्या समारोपप्रसंगी कवी रवि सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close