Uncategorized
आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे श्री २०२६ चा मानकरी ठरले कोल्हापूरचे पांडुरंग भोसले तर सोलापूरचे शाहनवाझ नदाफ-उपविजेता
पंढरपूरात शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न;


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपुर (प्रतिनिधी ) महर्षी वाल्मिकी संघ आयोजित
छञपती शिवाजी महाराजयांच्या जयंती निमित्त आदय क्रांतिकारक “”राघोजी भांगरे श्री २०२६””या पश्चिम महाराष्ट्रस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन पंढरपूर येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता करण्यात आले होते.
या स्पर्धा पै.यश अंकुशराव यांच्या प्रयत्नामुळे घेण्यात आल्या.
या स्पर्धा मा. डॉ. संजय मोरे सर (सचिव IBBFF/AFBF), शिव छत्रपती पुरस्कार सन्मानीत तसेच राजकुमार सूरवसे (अध्यक्ष,सोलापूर जिल्हा शरीर सौष्ठव संघटना)यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या सहकाऱ्याने या भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला होता.
या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली ,सोलापूर धाराशिव व लातूर या जिल्ह्यातून ९० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धा ६ वजनी गटात घेण्यात आल्या. प्रत्येक वजनी गटात ५ बक्षिसे ठेवण्यात आली होती.
प्रत्येक गटात ५ बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम बक्षीस ₹ ५०००/, २) ₹ ४००० /– ३) ३०००/–२) २०००/–१) १०००/- त्याच बरोबर सर्व विजयी खेळाडूंना सन्मान चिन्ह, व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
६ गटातील प्रथम विज्येत्या मध्ये पुन्हा. एकदा स्पर्धा झाली त्या मध्ये पांडुरंग भोसले आणि शानवाज नदाफ यांच्या मध्ये चुरशीची लढत झाली, त्या मध्ये पांडुरंग भोसले सरस ठरला व त्याला राघोजी भांगरे श्री २०२६ चा मानकरी घोषित करण्यात आले.त्याला रोख ₹ ३३,०००/– सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
तसेच उप विजेता शानवाज (सोलापूर) याला ₹ १५,०००/-.
तसेच बेस्ट पोझर मनोहर लाड ₹ ५,०००/- ( सांगली) , व मोस्ट इम्प्रुव्हड शोएब कुरेशी (सोलापूर) ₹ ५,०००/– देण्यात आले.
या स्पर्धेसाठी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रणव परिचारक,लक्ष्मण शिरसट, धनंजय कोताळकर, संदीप अधटराव व महादेव धोत्रे, संग्राम अभंगराव, विक्रमसिंह भोसले, बापु शिंदे, विनायक संगीतराव, सागर तारापूरकर, विकी मोरे, नागेश जाधव, संदीप माने, बाळासाहेब माने, अमित नेहतराव, सुनील अधटराव, लाला पानकर, जालिंदर करकमकर, सुरज पेंडाल, मनमोहन अभंगराव, विश्राम कोताळकर, चंद्रकांत जाधव, सोमनाथ ननवरे, रोहन कांबळे, प्रसाद कोळी, नवनाथ करकमकर आदी उपस्थित होते.
परीक्षक म्हणून रामकृष्ण चितळे( सांगली) प्रमोद काटे(सोलापूर), नजीर शेख(सोलापूर),राहूल परीट (कोल्हापूर),गोरख गडसिंग (सोलापूर),शकील बडेघर(सोलापूर), शफी शेतसदी(सोलापूर),शरणकुमार कुंभार(सोलापूर) व रतिकांत पाटील(सोलापूर( यांनी काम पाहिले.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी G S जीम चे संचालक गणेश साळुंखे व वाल्मिकी संघाचे सभासदांनी परिश्रम घेतले.
सर्व विजयी खेळाडूंना सोलापूर जिल्हा शरीर सौष्ठव संघटने चे अध्यक्ष राजकुमार सूरवसे व इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.



