नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 17 मधून माधुरी दिलीप धोत्रे यांचा 1024 विक्रमी मतांनी विजय
अ मधून लोकेश नागेश यादव यांनीही 410 मतांनी विजय मिळावीला


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :- नगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 ब मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या सुविद्य पत्नी माधुरी धोत्रे यांना 1958मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार लता संजय निंबाळकर यांना 934 मिळाली. माधुरी धोत्रे यांचा 1024 मतांनी विजयी झाला. अपक्ष उमेदवार अमृता विद्युतराव यांना 646 रसिका काळबांडे
60 आरती चव्हाण 20 प्रभावती सुडके 73 मते मिळाली.

17अ मधून लोकेश यादव यांना 1702 मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अंबालाल उर्फ गुरु दोडिया यांना 1292 मते मिळाली. लोकेशन 410 मतांनी विजय झाला. विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे अमित अवघडे यांना 301अपक्ष उमेदवार किशोर खिलारे यांना 190 अमोल घोडके यांना 51 बादल यादव यांना 102 मते मिळाली.




