Uncategorized

पंढरपूरच्या विकासाचे व्हिजन घेऊन आले आहे : प्रणिताताई भालके

प्रभाग अठरा मध्ये विनायक देवमारे व संगीता धुमाळ यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :- पंढरपूर नगर पालिका गेली अनेक वर्ष परिचारकांच्या ताब्यात असून नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम केलेले दिसत नाही. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. मैला मिश्रित पाणी, धुळीचे साम्राज्य, रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. पंढरपूरतील नागरिकांना यातून मुक्त करण्यासाठी मी नगराध्यक्ष पदाचीची उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे मला आपण प्रचंड मताने निवडून द्याल असा विश्वास वाटतो असे मत डॉ. प्रणिताताई भालके यांनी व्यक्त केले..

बागवान मोहल्ला संत पेठ येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार विनायक बसवेश्वर देवमारे व संगीता अंगद धुमाळ व स्वतःच्या प्रचार सभेसाठी त्या येथे आल्या असता बोलत होत्या. पुढे बोलताना डॉ. प्रणिताताई भालके म्हणाल्या की, पंढरपूर नगरपालिकेमध्ये सामान्य नागरिकांची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आपण विजयी झाल्यास प्रत्येक प्रभागात जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्येचे निवारण केले जाईल. सत्ताधारी कायम म्हणतात की आम्हाला निधी कुठून मिळणार “हिम्मत ये मर्दा तो मदत ये खुदा ” या म्हणीप्रमाणे घडणार आहे. निधी कोठून व कसा मिळवायचा हे मला माहित आहे. तेव्हा मला एक वेळ निवडून पाच वर्ष काम करण्याची संधी द्यावी. पाच वर्षात नागरी सुविधा सोडून शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवीण. यांची सुरुवात मला पंढरपूर नगरपालिकेच्या इमारतीपासून करावी लागणार आहे. माझ्याकडे तुम्हाला थेट काम करून घेण्यासाठी भेटावे लागेल. मध्ये कोणीही नसेल.त्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्राध्यापक प्रसाद सातपुते, एडवोकेट सत्यम धुमाळ, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सुधीर धुमाळ विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके हे आपले मनोगत व्यक्त करून तीर्थक्षेत्र विकास आघाडीला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close