पंढरपूरसाठी लागेल तेवढा विकास निधी देऊ :जयकुमार गोरे
फक्त बोलून विकास होत नसतो निधी कुठून आणणार विरोधकांना केला सवाल


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेची ही निवडणूक पाच वर्षासाठी पंढरपूरचा विकास करण्यासाठी कोणाच्या ताब्यात द्यायची त्याचीही निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी गेल्या दहा-बारा दिवसात अचानक कोणीतरी आले. मागच्या निवडणुकीत दिसले ते निवडणूक लागली की या निवडणुकीत दिसले. म्हणजे निवडणूक लागली तरच येणार नाहीतर गायब होणार.असे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता तिगतवर जातीपातीवर बोलत आहेत. पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी साडेतीन हजार कोटी निधी लागणार आहे . हा निधी भालकेताई कुठून आणणार हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी एक फोन लावला तर निधीला लगेचच मान्यता मिळेल.असे असे विचार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिकेच्या निवडणुक प्रचारासाठी शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पंढरपूरला एमआयडीसी आणायची असून मोठमोठे उद्योजक यात आपली गुंतव
णूक करणार आहेत. शहरातील बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. भगिनींना रोजगार मिळणार आहे. व हे सर्व क्षमता मोदी व फडणवीस यांच्यामध्ये आहे. त्या. मुळे नुसते बोलून, रिल्स, सोशल मीडियाद्वारे करून तयार करून काही होणार नाही.
प्रशांत परिचारक यांनी म्हटल्याप्रमाणे काही रस्त्याचे काम राहिलेले आहे त्याला दोनशे कोटी निधी लागणार आहे. म्हणून काम करण्याची क्षमता फक्त आमच्या मध्येच आहे. मुळे पंढरपूरच्या विकासासाठी पण भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार आपण या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून देऊन विकास करण्याचे संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचकावर माजी आमदार प्रशांतराव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव पापरकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, माजी उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत शिंदे, भारत माळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामलताई शिरसट नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.



