अखेर पंढरपूर नगरपालिका निवडणूक तिरंगी होणार !
परिचारक गट भाजपकडून तर आमदार अभिजित पाटील तिसरी आघाडी करून लढणार


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे शहर सुधारणा विकास आघाडी करून निवडणूक लढविणार का भाजपकडून लढणार तिढा सुटला असून कमळ चिन्ह घेऊन त्यांचा गट भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार हे निश्चित झाले आहे. तर वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्यामुळे अभिजीत पाटील यांच्या गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून निवडणूक न लढविता विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी ही तिसरी आघाडी करून अध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सारिका राहुल साबळे यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी शिरसट शामल लक्ष्मण,शिरसट प्रतिक्षा विक्रम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून प्रणिता.भगीरथ भालके यांनी अर्ज दाखल केलेला आहे. चर्चेत असणारे साधनाताई भोसले, वैशाली वाळूजकर, स्मिता आधटराव यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले नाहीत.

शिरसट शामल लक्ष्मण भारतीय जनता पक्ष

सारिका राहुल साबळे विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी

शिंदे भारती राजू वंचित बहुजन आघाडी
अनेक प्रभागात उमेदवार उभा केले आहेत.आज शेवटच्या दिवशी दिनांक 17/11/2025 रोजी नामनिर्देशन पत्र प्राप्त अर्जाची माहिती.
आज प्राप्त अध्यक्ष पदाचे अर्ज – 04 एकूण अध्यक्ष पदाचे अर्ज – 08आज प्राप्त सदस्य पदाचे अर्ज – 256 एकूण सदस्य पदाचे अर्ज – 366
नगराध्यक्ष पदासाठी 7उमेदवारांनी 8 उमेदवाऱी अर्ज दाखल केले ते पुढील1)मुलाणी जैतुनबी अब्दुलरौफ अपक्ष2)भालके प्रणिता भगीरथ तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर व अपक्ष3)बंदपट्टे कांचन तुळजाराम अपक्ष4)साबळे सारिका राहुल श्री. विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी, पंढरपूर5)शिरसट शामल लक्ष्मण भारतीय जनता पार्टी6)शिरसट प्रतिक्षा विक्रम भारतीय जनता पार्टी7)शिंदे भारती राजू वंचित बहुजन आघाडी
एकूण 36जागेसाठी 366 असे विक्रमी अर्ज दाखल झाले असून. 25तारखे पर्यंत किती अर्ज राहतील व कोणामध्ये प्रमुख लढती होतील हे स्पष्ट होणार असून.नगराध्यक्ष पदा बाबत ही स्पष्टता येईल.



