Uncategorized

पालवीचा संस्थेला राष्ट्रीय स्तरावरील Forbes we serve india “Women-led Social Innovation या श्रेणीत सन्मान

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पालवी – प्रभा हिरा प्रतिष्ठानला राष्ट्रीय स्तरावरील  Forbes we serve india “Women-led Social Innovation (West Zone of India)” या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पालवी–प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या डिंपल घाडगे व तेजस डिंपल घाडगे यांना प्रमुख पाहुणे श्री. भूपतिराजू श्रीनिवास वर्मा, केंद्रीय भारी उद्योग व पोलाद राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास श्री. पी. विष्णु कुमार राजू (विधायक, विशाखापट्टणम व भाजपचे फ्लोअर लीडर), श्री. पल्ला श्रीनिवास राव (विधायक, विशाखापट्टणम) व श्रीमती गौथू सिरीषा (विधायक, विशाखापट्टणम) उपस्थित होते.
पुरस्कार श्रेणीचे उद्दिष्ट:
या श्रेणीचा हेतू महिलांच्या नेतृत्त्वाखाली राबविलेल्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना गौरविणे हा आहे, जे शिक्षण, आरोग्य, उपजीविका, पर्यावरण, लिंग-समानता, सामाजिक न्याय, सामाजिक उद्योजकता इत्यादी क्षेत्रांतील गंभीर सामाजिक प्रश्नांना उत्तर देतात आणि सर्वसमावेशक, सकारात्मक परिणाम निर्माण करतात.
उपक्रमाबद्दल:
Forbes India – We Serve India, प्रस्तुत: Lions Clubs International — हा Network18 व Lions Clubs International यांच्या सहकार्याने संपूर्ण देशभर राबविला जाणारा उपक्रम आहे. करुणा, नवोन्मेष व उद्देश्यनिष्ठ नेतृत्त्वाच्या आधारे आपल्या समुदायात मोजता येणारा बदल घडविणाऱ्या परिवर्तनकत्र्यांच्या कार्याला ही व्यासपीठ दिशा देते.

 

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close