Uncategorized

प्रमोद महाराज जगताप यांना वारकरी पुरस्कार प्रदान

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर- चैतन्यसद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मानाचा अठ्ठाविसावा वारकरी पुरस्कार ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांना चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

येथील वासकर महाराज यांच्या संतपेठ येथील मठात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, विद्वान व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल महाराज वासकर होते.

मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमास एकनाथ महाराज वासकर, प्रभाकर महाराज बोधले, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,न्यायमूर्ती चकोर महाराज बाविस्कर, शंकर महाराज बडवे, भागवत महाराज चवरे, अक्षय महाराज भोसले, शशिकांत काटे, जयवंत महाराज बोधले, श्रीनाथ महाराज शिरवळकर, मदन महाराज कदम, कृष्णा महाराज चवरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चैतन्य महाराज देगलूरकर यांनी, प्रमोद महाराज यांचे वारकरी पंथासाठी केलेले प्रबोधन कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक रेवणसिद्ध लामतुरे यांनी केले तर सूत्रसंचालन उमेश महाराज बागडे यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close