Uncategorized

भारतीय बौद्ध व त्रिरत्न बौद्ध महासभेच्या वतीने समता रॅली संपन्न!

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरुवारी सकाळी 10 वाजता सारनाथ बुद्ध विहार आंबेडकर नगर पंढरपूर येथे भगवान बुद्ध, सम्राट अशोक, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन निलम हणमंत बंगाळे, कविता दत्तात्रय भोसले, संगीता बापू सर्वगोड यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा व त्रिरत्न बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता व धम्म संदेश रॅली काढण्यात आली. हातात धम्म ध्वज घेऊन या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने धम्म अनुयायी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विशेष आकर्षक मूर्ती होती. डॉ. आंबेडकर नगर, लहुजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर असा मार्ग होता.


समता सैनिक दल व सर्व भिमा अनुयायी यांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना दिली.
भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष राहुल सर्वगोड, तालुकाध्यक्ष समाधान जाधव,त्रिरत्न बौद्ध महासभाचे प्रभाकर सरवदे व बापू सर्वगोड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप धूप प्रज्वलीत करून सामूहिक रित्या पंचशील त्रिशरण घेऊन रॅलीची व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दल व त्रीरत्न बौद्ध महासभा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close