Uncategorized

पंढरपुर शहरातुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोराकडुन पाच मोटार सायकली जप्त.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपुर शहरामधुन गणेश विसर्जना दिवशी दिनांक ०६/०९/२०२५ रोजी दोन मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या त्याचा मागोवा घेत पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करीत सांगली येथे गेले होते. त्यानंतर गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी (१) फिरोज नबीलाल मुल्ला, वय २९ वर्षे, रा. जुळेवाडी ता. तासगाव जि. सांगली (२) उध्दव प्रताप मिले, वय ५५ वर्षे, रा. तांदुळवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर याने माहे फेब्रुवारी व सप्टेंबर मध्ये एकुण ०४ मोटार सायकली चोरल्या आहेत त्याअनुषंगाने सदर आरोपीस काल दिनांक २९/०९/२०२५ रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांने पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील एकुण ०४ गुन्हयाची कबुली दिल्याने खालील नमुद गुन्हे उघडकीस आले आहेत.

गु.र.नं.१) ५७२/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२),२) ५७५/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२),३) ६१८/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२),४) ६३६/२०२५ भा.न्या.सं.३०३(२)५) ६२०/२०२५ भा.न्या.सं.३०३(२)

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी  अपर पोलीस अधिक्षक . प्रितमकुमार यावलकर,  सहा. पोलीस अधिक्षक,  प्रशांत डगळे, पंढरपुर उपविभाग पंढरपुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोसई  राजेश गोसावी, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोका ३१ कपिल माने, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोकॉ १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १३०४ दिपक नवले, तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण चे पोकॉ रतन जाधव यांनी केली आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close