तंटक हॉस्पिटल अँड डेंटल क्लिनिकचा वर्धापन दिन व स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य व दंत तपासणी शिबिर संपन्न.


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर : येथील के बी पी चौकातील तंटक हॉस्पिटल अँड डेंटल क्लिनिकचा वर्धापन दिन व स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी व दंत तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरात 114 रुग्णाची तपासणी व 57 रुग्णाची दंत तपासणी करण्यात आली.या प्रसंगी हॉस्पिटलचे डॉ सुरज तंटक यांनी उपस्थितांना विविध आजाराची माहिती सांगून घ्यावयाची दक्षता या विषयी माहिती सांगितली. डेंटिस्ट डॉ मयुरी सुरज तंटक, डॉ. निखिल निंबराज तंटक यांनी दाताची काळजी कशी घ्यावी व स्वच्छता कशी ठेवावी या विषयी मार्गदर्शन केले.

या शिबिरात बी.पीहिमोग्लोबिन,रक्तातीलसाखर(बीएस.एल) एचबीए1सी,थायरॉईड,इत्यादींची तपासणी करण्यात आली तसेच इ सी जी काढण्याची सोय केली होती. शिबिरात सहभागी पेशंटच्या पुढील दंत उपचारासाठी सवलत देण्यात येणार असल्याचे सागितले.

याप्रसंगी बांधकाम व्यवसायिकाची क्रेडाई या संघटनेचे उपाध्यक्ष मा .शार्दुल शरद नलबिलवार, पंढरपूर रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष रो.डॉ. वैभव सादिगले, सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्राचार्य रो.डॉ. कैलास करंडे, रोटरी क्लब पंढरपूरचे सर्व सदस्य शहरातील डॉक्टर्स, व्यापारी मित्र,सामाजिक कार्यकर्ते, वार्ताहर ॲडव्होकेट, सरपंच,अधिकारी,शिक्षक, हॉस्पिटलचे पेशंट्स, त्यांचे मित्र, यांनी समक्ष व फोन करून त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.



