Uncategorized

माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप

माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे आणि समाजसेवक अशोक ( पिंटू) शिंदे यांनी केले विद्यालय आणि अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांना खुश

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्ट

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-माजी आमदार प्रशांतराव परिचारक
यांच्या वाढदिवसानिमित्त, पंढरपूर शहर आणि तालुक्यात जोरदार सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे आणि समाजसेवक अशोक उर्फ (पिंटू)शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  येथील दोन विद्यालय आणि दोन अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले. याप्रसंगी विविध ठिकाणी विविध प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

पंढरपूर शहरातील सांगोला रोडवरील अविनाश विद्यालय,
बालमित्र पूर्व माध्यमिक विद्यालय, गुरुदेव नगर येथील अंगणवाडी तसेच सावित्रीबाई फुले चौकातील बनसोडे मळा अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले. विद्यालय आणि अंगणवाड्यातील विद्यार्थी
यामधील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
प्रत्येक शाळेतील शिक्षक वर्गाकडून माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे आणि समाजसेवक अशोक उर्फ (पिंटू)शिंदे यांचे आभार मानले.

याप्रसंगी  कामगार नेते नानासाहेब वाघमारे प्रभाकर माने, नागेश राहीरकर, पांडुरंग गोडसे, सोहम शिंदे,ज्ञानेश्वर बनसोडे , हनुमंत राऊत , समाधान माळी, किरण जाधव, दादासाहेब क्षीरसागर, बजरंग बंदपट्टे ,अजित धोत्रे, जितेंद्र साळे ,गणेश जगताप, महादेव घोडके, भैय्या ताड, विकास देवमारे , अनिल गायकवाड, विलास मेडसिंगकर,प्रशांत राहीरकर, सोहम शिंदे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close