Uncategorized

प्राचार्य डॉ. सिकंदर शिवराम ढवळे सेवानिवृत्ती गौरव समारंभ 8 ऑगस्ट रोजी होणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :- ज्ञानदानाचा वसा घेऊन, वाटचाल केली प्रामाणिकतेनं, शिकवले अनेकांना जीवनाचे धडे, तत्त्वज्ञान दिले प्रत्येक क्षणात नेमके !  34 वर्ष सेवा केली, माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा आत्मा बनून राहिलो, शिस्त, आदर्श आणि ममत्वाने विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले! असे व्यक्तिमत्व असणारे कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ सिकंदर शिवराम ढवळे सेवानिवृत्ती गौरव समारंभ शुक्रवार दि. ०८ ऑगस्ट २०२५ सायं. ५.३० वा. स्थळ : श्रीराम मंगल कार्यालय, दुध पंढरी जवळ, इसबावी पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.. प्रशांतराव परिचारक माजी विधानपरिषद सदस्य यांचे हस्ते सत्कार होणार असून यावेळी संजय आवटे संपादक, दै. लोकमत हे व्याख्याते म्हणुन उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे   प्रा. सुभाषराव माने मा. अध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई हे  भूषविणार आहेत.

प्रमुख अतिथी, प्रा. जयंत आसगावकर आमदार, पुणे विभाग शिक्षक मतदार संघ,. कल्याणराव काळे चेअरमन, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सह.सा.का., भगीरथदादा भालके माजी चेअरमन, श्री विठ्ठल सह. साखर कारखाना आदी उपस्थित राहणार आहेत.सेवानिवृत्तीच्या या मंगल क्षणी,  उपस्थिती रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. सिकंदर ढवळे सेवा गौरव समिती इसबावी पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close