पंढरपूरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहाने आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिर स्नेहभोजन, निबंध स्पर्धा,सामाजिक प्रबोधन आणि जेष्ठ कलावंताचा सन्मान करुन ही जयंती साजरी करण्यात आली.
शाखा क्रमांक 1

थोर साहित्यिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त काल क्रांतीवीर लहूजी वस्ताद चौक येथे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन रक्तदान शिबिराचे उद्घघाटन करण्यात आले. ह्या शिबिरात 51 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी
मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे आणि अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे ह्यांच्या जयंत निमित्त प्रतिमेचे पूजन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहीर .नंदकुमार पाटोळे श्री.गोविंद पाटोळे,शाहीर विजय व्यवहारे, अण्णा शिर्के,कालिदास सोनवणे, हार्मोनियम विषारद,भोलेनाथ भोसले प्रसिद्ध सनईवादक, अरविंद भोसले
हरिदास कांबळे,दत्तात्रय वाघमारे, अशोक वाघमारे,महादेव वाघमारे शशि कानाडे,रवी वणारे,पांडुरंग सोनवणे,बंडू केंगार. यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी मध्यवर्ती जयंती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शाखा क्रमांक 2

एक ऑगस्ट 2025 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची यांची 105 वी जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन आमदार प्रशांतराव परिचारक (माजी विधानसभ सदस्य )यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. यावेळी
आर पी आय चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे माजी नगरसेवक इब्राहिम भाई बोहरी, माजी नगरसेवक राजाभाऊ सर्वगोड . नगरसेवक अभ्यंकर, रिपाईचे शहराध्यक्ष ऍड. कीर्तीपाल सर्वगोड सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवमारे, अमोल डोके भाजपचे शहराध्यक्ष लाला पानकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे माजी अध्यक्ष शील रतन झेंडे,युवक नेते उमेश सर्वगोड साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी बोलताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे काम महाराष्ट्रासाठी व देशासाठी अभिमानास्पद आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोलाचे आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी कामगारांचा लढा उभा केला मुंबई महाराष्ट्रात राहिले पाहिजे यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडातून व साहित्यातून आपल्या आंदोलन चालू ठेवले होते असं वक्तव्य जिल्ह्याचे आमदार प्रशांतजी परिचारक यांनी मांडले आणि जयंती निमित्त सर्व बहुजनातील सर्व घटकातील लोकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी वरील सर्व आजी माजी नगरसेवक चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले. याप्रसंगी माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, गोशाबा टाइम्सचे संपादक श्रीकांत कसबे, ऍड बादल यादव, शंकर वाघमारे, धनंजय खिलारे, कबीर देवकुळे…

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवक मंडळ शाखा क्रमांक २ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर संत पेठ पंढरपूर येथे जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन पंढरपूर नगरपालिका कामगार संघटनेची जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते अजित खिलारे,पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे नेते संदेश कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय कांबळे यांच्या शुभहस्ते अँड.सुनील वाळुजकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाखा क्रमांक 3

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवक मंडळ शाखा क्रमांक ३ जुनी पेठ पंढरपूर येथे जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन पंढरपूर नगरपालिका कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन दिनेश साठे, संचालक धनजी वाघमारे, जयंत पवार, संभाजी देवकर, मोहन अधटराव, दर्शन वेळापुरे, राणीताई गायकवाड व युवक संघटनेचे प्रमुख माजी नगरसेवक महेश साठे, महावीर भाऊ कांबळे, दास अंबुरे, संजय माने व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी किशोर दंदाडे यांच्या शुभहस्ते अँड.सुनील वाळुजकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.




