Uncategorized

देश बलवान  बनविणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी :अजयकुमार सर्वगोड

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक नागरी सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

(अजयकुमार सर्वगोड व आयु. आम्रपाली  यांचा सन्मान करताना सुभाष ढवळे सर.सोबत एल. एस. सोनकांबळे विजयानंद भालशंकर प्राचार्य डॉ. सिकंदर ढवळे……)

पंढरपूर :-भारता समोर आज अज्ञानता व गरिबी ही मोठी समस्या असून समाज साक्षर बनविणे व गरिबी संपुष्ठात आणली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजेत. जात व धर्मापेक्षा देश मोठा ही भावना मजबूत करुन देश बलवान करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. ती सर्व नागरिकांची जबाबदारी आहे असे विचार अजयकुमार सर्वगोड कार्यकारी अभियंता कणकवली यांनी व्यक्त केले.  कार्यकारी अभियंता  या पदावरून सेवानिवृत्तीनंतर त्यांचा पंढरपूर येथे हॉटेल शामियांना सभागृह येथे” अजयकुमार सर्वगोड सेवापूर्ती गौरव सन्मान सोहळा समिती “चे वतीने  21जून 2025 रोजी अजयकुमार व त्यांची पत्नी आम्रपाली यांचा सत्कार सुभाष ढवळे सर( से. नि.मुख्याध्यापक, गौतम विद्यालय) यांचे हस्ते शाल, फेटा, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन  करण्यात आला.  तसेच  यावेळी त्यांच्या मातोश्री  श्रीमती लक्ष्मी सिताराम सर्वगोड यांचा सन्मान विमल  सोनकांबळे यांचे हस्ते  करण्यात  आला.

यावेळी सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एल एस सोनकांबळे हे होते. त्यांचा सत्कार गौतम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुभाष ढवळे सर यांच्या हस्ते करण्यात आला. पुढे बोलताना अजयकुमार सर्वगोड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मि प्रथम भारतीय व नंतर ही भारतीय ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे. आज दोन्ही गुरूच्या हस्ते माझा सन्मान होत आहे ही निश्चितच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

 (अजयकुमार सर्वगोड मनोगत)

(संयोजन समिती)

39 वर्षे शासकीय सेवा कोणताही डाग न लावू देता सेवा करून मी सेवानिवृत्त झाले आहे. माझ्या कुवती प्रमाणे मी सामाजिक कार्य केले आहे. यापुढे मी प्रामाणिकपणे कार्यरत राहीन. कोकणात माझे कार्य होते तेथे माझा सन्मान झाला आहे. परंतु माझ्या मायभूमीत माझा सत्कार होणे हे निश्चितच आनंदाची बाब आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जनतेच्या करातून पेन्शन मिळते. त्यामुळे त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतलाच पाहिजे. असेही त्यांनी आवाहन केले.

(समितीचे सदस्य सत्कार करताना…)

यावेळी सुभाष ढवळे सर म्हणाले की, अजय कुमार माझा विद्यार्थी सुरूवातीपासून वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारून चर्चा करण्याची सवय होती . आज तो उच्च पदावर पोहोचला व सेवानिवृत्त झाला. त्याचा सत्कार माझ्या हस्ते होत आहे.ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. सामाजिक भान ठेवून त्यानी आपले कर्तव्य पार पाडले आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी त्यामध्ये खंड पडू देऊ नये.

  (उपस्थित समूह)

यावेळी भारत माळी, सुनील सर्वगोड माजी उपनगराध्यक्ष, अक्षय सर्वगोड कु. अजिंक्या सर्वगोड, सागर यादव, सुनील वाघमारे, विजयानंद भालशंकर (सोलापूर )यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात एल. एस. सोनकांबळे(से. नि. जिल्हा हिवताप अधिकारी) म्हणाले की अजयकुमार सर्वगोड हॆ शासकीय सेवेत होते तरी त्यांनी सामाजिक कार्य करुन सामाजिक नाळ तोडली नाही म्हणुन त्यांचा गौरव होत आहे.यांची निश्चित प्रेरणा घेतली पाहिजे. पुढे बोलतांना ते म्हणाले की कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपली सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत राहिले पाहिजे. कारण येणारा फार काळ भयावह आहे. मागील काळ पुन्हा येत असून आपण सावध पणे आपणाला दिलेल्या मताच्या अधिकाराचा योग्य वापर केला पाहिजे.


कार्यकर्माचे सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवारांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर संविधान उद्देशीकिचे सामूहिक वाचन दोडके सर यांचे सोबत करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर मागाडे सर यांनी केले. स्वागत व प्रास्तविक प्राचार्य डॉ. सिकंदर ढवळे सर यांनी केले. मान्यवारांच्या संदेशाचे वाचन सचिन भंडारे सर यांनी केले तर सन्मानपत्र वाचन बा. ना. धांडोरे यांनी केले. अजयकुमार यांचा परिचय चंद्रकांत सातपुते सर यांनी केला. तर आभार वैभव माने यांनी मानले.

(रामदासदादा सर्वगोड, डी. राज सर्वगोड  वअजयकुमार सर्वगोड पत्नी व मातोश्री सोबत)

यावेळी रिपाई राज्य सचिव बाळासाहेब कसबे, संभाजी ब्रिगेड प. म. उपाध्यक्ष किरणराज घाडगे, अंकुश शेम्बडे, सत्यवान किर्ते, शशिकांत बाबर, प्राचार्या सुरांजली मुळे सोनकांबळे, ऍड. प्रवीण मुळे,भालचंद्र कांबळे, बी. वाय. कांबळे, एस. के. आयवळे,नंदकुमार वाघमारे (मुख्याध्यापक, गौतम विद्यालय पंढरपूर), राहुल ढवळे, बशीर तांबोळी (माजी चेअरमन, न. पा. शि. प्र. मंडळ) बिराप्पा मोटे, बी आर. भोसले, लक्ष्मण सावंत, प्रा. शिवाजीराव वाघमारे, प्रा. भास्कर बंगाळे, प्रवीण माने, उमेश सर्वगोड, सुजितकुमार सर्वगोड, राहूल सर्वगोड, सुकदेव माने, राजु बनसोडे, दिलीप पवार (मराठा सेवा संघ )ऍड. चारुशीला गेजगे,ऍड. सुषमा जाधव, सुहास जाधव, धम्मपाल जाधव, गौतम साबळे, ऍड. सी. एच बनसोडे, सतीश तुपारे, साहेबराव चंदनशिवे सर, जगदीश मागाडे, सांगोला, अरुण कसबे सांगोला, योगेश जाधव, केशव ननवरे, भारत ताकतोडे, ग्राम पंचायत होराळे ता. खालापूर जी. रायगड मधील ग्रामपंचायत सदस्य शरद मुंढे राहूल पाटील
राजू पाटील,भालचंद कदम,किरण पाटील जांभवली ता. खालापूर जी रायगड चे ग्रामपंचायत सरपंच  अविनाश कदम यांचेसह बहुसंख्य लोक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी उपाध्यक्ष अंबादास वायदंडे, सचिव दादासाहेब दोडके सर, गौतम सरतापे, सुनील वाघमारे, श्रीकांत कसबे,  आर. पी.. कांबळे,सेवागिरी गोसावी, चंद्रकांत सातपुते सर,इंजी. गिरीश वाघमारे आदिनी प्रयत्न केले.

( डी. राज सर्वगोड नगरसेवक, सुजितकुमार सर्वगोड, शिलरतन झेंडे, अमर शेवडे,  सत्कार मूर्ती सोबत)

शेवटी विविध संघटना व व्यक्तिगत नागरिकांनी अजयकुमार सर्वगोड यांचा सत्कार केला.
शेवटी स्नेह भोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली

c

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close