धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी धनगर समाजाची मागणी


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- आमचे सरकार आले तर धनगर समाजाचा अनुसूचित जाती (ST) मध्ये पहिल्या कॅबिनेट मिटिंग मध्ये निर्णय घेऊ असे आश्वसन 2014साली. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यांचा त्यांना विसर पडला आहे.धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावे्श होणार का नाही हॆ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी आषाढी वारी निमित्त पंढरपूरात आले नंतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे अशी मागणी मेल द्वारे केली असून आपल्या मार्फत सुद्धा करीत आहोत असे धनगर समाजाचे कार्यकर्ते अंकुश शेबंडे व बिराप्पा मोटे यांनी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये केली
2014 साली धनगर समाजाने पंढरपूर ते बारामती लॉंग मार्च काढला होता व उपोषणाचे आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्ष नेते व भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन सांगितले होते की धनगर समाजाचा अनुसूचित जाती (एस.टी )मध्ये समावेश होऊ शकतो. मि या बाबत पूर्ण अभ्यास केला आहे. कांग्रेस सरकार जाणीवपूर्वक चालढकल करत आहे.केंद्रात आमचे सरकार आहे. राज्यात जर आमचे सरकार निवडून दिले तर पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. त्या मुळे त्यांचे वर विश्वास ठेवून धनगर समाज त्यांचे सोबत गेल्याने त्यांना सत्ता मिळाली. मुख्यमंत्री पद मिळाले पण त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. समाजाला कायमच आशेवर ठेवले आहे. आमच्याच लोकमध्ये फूट पाडण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आरक्षणाचे गाजर दाखवून समाजाची मते ओरबडण्याचे काम सुरु आहे.
तेव्हा धनगर समाजाचा अनुसुचित जाती मध्ये समावेश होऊ शकत असेल तर होऊ शकतो. घटनात्मक आरक्षण देता येत नसेल देता येत नाही हॆ मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगुन हा विषय संपवून टाकावा. म्हणजे हा निवडणुकीचा विषय व्हायचे बंद होऊन समाजाला भावनिक करण्याचे राजकारण बंद होईल.
यावेळी सतीश लवटे, मायाप्पा हेगडकर उपस्थित होते.




