जेष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे यांना राज्यस्तरीय महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार जाहीर


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :, जेष्ठ साहित्यिक बाबुराव नामदेव धांडोरे (बा. ना. धांडोरे) यांना “महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संघ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्था पुणे च्या बतीने २०२३/२४ या सालासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन अणि अवलोकन) या फुले, शाहू, आंबेडकर साहित्याची दखल घेऊन राज्यस्तरीय महात्मा फुले आणि डॉ बाचासाहेच आंबेडकर ग्रंथपुरस्कार “तिसरा” पुरस्कारासाठी निवड केल्याचे पत्र अध्यक्ष- एल.टी. सावंत(माजी आमदार) सरचिटणीस प्रा. आर.आर. सोनकांबळे यांनी दिले आहे.
सदर पुरस्काराचे वितरण दयानंद माने साहेब निवासी संपादक सकाळ वृत्तपत्र मिडीया पुणे यांच्या हस्ते दिनांक २२/६/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ५ ते ८.०० वा. भारत इतिहास संशोधन मंडळ भारत नाट्य मंदिर जवळ, सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी वित्तरण करण्यात येणार आहे.
जोशाबा टाईम्स परिवाराचे वतीने अभिनंदन!!!



