अजयकुमार सर्वगोड यांचा राज्यशासना कडून ” उत्कृष्ट अभियंता” पुरस्कार देऊन गौरव


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :फुले आंबेडकरी चळवळीत सक्रिय असणारे व सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदावरून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे अधिकारी अजयकुमार सर्वगोड (कार्यकारी अभियंता कणकवली) यांना सन 2018-19 चा “उत्कृष्ट अभियंता “हा पुरस्कार सदाशिव साळुंखे सचिव (रस्ते) यांच्या हस्ते दिनाक 7 मे 2025 रोजी प्रदान करण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अजयकुमार सर्वगोड म्हणाले की याबद्दल मला मनस्वी अत्यानंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अटोकाठ प्रयत्न करणारे, शासनाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करणारे शासनाची निष्कलंकपणे सेवा बजावणारे, हुशार बुद्धिमान आणि कर्तबगार व्यक्ति म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते ) सदाशिव साळुंखे होय! अश्या महान हस्तींच्या हस्ते मला “उत्कृष्ट अभियंता” म्हणून पुरस्कार मिळाला आहे ही गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची आहे ….हा महाराष्ट्र शासनाचा बांधकाम विभागाचा सर्वोकृष्ठ पुरस्कार मला शासनाने दिला त्याबद्दल मी राज्य शासनाचा अत्यंत आभारी आहे…
सार्वजनिक विभागात काम करताना मला ज्या कर्मचारी बांधवानी मोलाचे सहकार्य केले, माझी पत्नी आणि कुटुंब मधीलसर्व सदस्य,सर्व पत्रकार बांधव लोक प्रतिनिधी, तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, सध्याचे विद्यमान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब सर्व बांधकाम विभागतील अभियंता वर्ग, मित्र मंडळी आणि ज्यांनी मला सहकार्य केले त्या मुळे मला हा पुरस्कार मला मिळाला हे मी समजतो त्या सर्वांचा मीं अत्यंत आभारी आणि ऋणी आहॆ.
सा. जोशाबा टाईम्स परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा!



