होलार समाज विकास प्रतिष्ठान आयोजित राज्यव्यापी होलार समाज परिषद 4 मे रोजी होणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-रविवार दिः ४ मे २०२५, रामकृष्ण गार्डन व्हिला, सांगोला होलार समाज विकास प्रतिष्ठान आयोजित राज्यव्यापी होलार समाज परिषद होणार असून परिषदेचे उदघाटन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य)यांचे हस्ते होणार असून परिषदेचे अध्यक्षस्थानी नाथन केंगार (उपाध्यक्ष, होलार समाज विकास प्रतिष्ठान) हॆ असणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ललित बाबर (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते) प्रभाकर केंगार (सामाजिक कार्यकर्ते सांगली)डॉ. निशांत माटे (समाजकार्य महाविद्यालय कामटी, नागपूर) डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे (वैद्यकीय अधिकारी सावंतवाडी) ज्ञानेश्वर ठोकळे (अध्यक्ष, आंबेडकर संस्था) डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे (स्वामी समर्थ हॉस्पिटल, सदाशिव नगर)चंद्रकांत खंडाईत (आंबेडकरवादी कार्यकर्ते, सातारा)प्रा. डॉ. धनंजय होनमाने (जी. डी. लाड महाविद्यालय, कुंडल). भिकाजी गुळीग (सामाजिक कार्यकर्ते)आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनसठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकाचे वतीने करण्यात आले आहे.