Uncategorized

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान वसंतनाना देशमुख यांनी भूषवले.

प्रभारी प्राचार्य डॉ समाधान माने यांनी त्यांच्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधनातील प्रगतीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या विविध कोर्सेस आणि उपक्रमांची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाने ६५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांचा घडवणारा हा शिक्षण मंदिराचा मेळावा संस्मरणीय ठरला. या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा गौरव करत, भविष्यात माजी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून संस्थेचा विकास अधिक व्यापक करण्याची गरज अधोरेखित केली.

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त सचिव आणि माजी प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमात दिलीप कोरके यांनी भविष्यातील मेळावा भव्य दिव्य करण्याचे मान्य केले, स्नेहल राऊळे यांनी आपल्या शैक्षणिक कार्यात महाविद्यालयाचे योगदान अधोरेखित केले, डॉ. जयश्री भोसले यांनीपदवीआणिपदव्युत्तरपदवीशिक्षणासाठी महाविद्यालयाने केलेले सहकार्य आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा झालेला विकास याबाबी सांगितल्या, लक्ष्मी यादव यांनी शिक्षकांनी केलेले विशेष मार्गदर्शन, दिलेले प्रोत्साहन याविषयीच्या आठवणी सांगितल्या, समाधान काळे यांनी आपल्या राजकीय व्यक्तिमत्त्व जडणघडणीत महाविद्यालयाने दिलेली संधी या गोष्टींचा उहापोह केला, प्रतीक्षा वाघमोडे यांनीकवितावाचनकरून शिक्षकां प्रति आदर व्यक्त केला, डॉ. फैमिदा विजापुरे यांनी विद्यार्थी दशेतील आठवणी जाग्या केल्या, सागर पडवळ, प्रा. आर. डी. पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुशील कुमार शिंदे यांनी केले तर प्रभारी प्राचार्य डॉ. समाधान माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ज्योतिराम भायगुडे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, पत्रकार जैनुद्दीन मुलाणीतसेच विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थी व प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे व डॉ. भारती सुडके यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. दादासाहेब हाके यांनी मानले. माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून महाविद्यालयाचा विकास अधिक भक्कमपणे घडवण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त झाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close