ॲड. बादल यादव आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ॲड. बादल यादव यांना ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, पंढरपूर यांच्यातर्फे “राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
विधी क्षेत्रात सामान्य नागरिक तसेच रुग्णांना मदत व सहकार्य करीत असलेल्या ॲड. बादल यादव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या आदर्श समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे…ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुद्देशिय संस्था, पंढरपूर.
शनिवार दि.२२/०३/२०२५ रोजी दु.२ वाजता.योग भवनहॉल,एल.आय.सी. ऑफिसच्या पाठीमागे, पंढरपूर येथे कार्यक्रम पार पडला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नारी मुख्याध्यापक चिखर्डे केंद्रप्रमुख सोलापूर जिल्हा शिक्षक समिती जिल्हा उपाध्यक्ष किशोर बगाडे यांचे अध्यक्षते खाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ ननवरे (बिल्डर्स डेव्हलपर्स पंढरपूर) आनंद खटावकर (बिल्डर्स डेव्हलपर्स पंढरपूर) श्रीमती विमल बनसोडे संस्था अध्यक्षा, ब्लु स्टार सामाजिक व बहुउद्देशिय संस्था, पंढरपूर. श्रीमती सविता सुकाळे प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी संघटक आदी उपस्थित होते.