महाबोधी महाविहार मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करणार:अप्पासाहेब जाधव
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पंढरीत निघाला भव्य मोर्चा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर:-महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली ते बिहार मधील बुद्धगया जगातील सर्व बोद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे आहे. महाबोधी टेम्पल कायदा रद्द करून महाबोधी महाविहार च्या व्यवस्थापन समिती मध्ये सर्व विश्वस्त बौद्ध धम्माचे नियुक्त करावेत. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीचे वतीने अप्पासाहेब जाधव यांनी दिला.महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीचे वतीने आज शुक्रवार दिनांक 21मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून भव्य मोर्चा निघुन तहसील कार्यालय येथे गेला. यावेळी नायब तहसीलदार पुदलवाड यांना निवेदन दिले. यावेळी अप्पासाहेब जाधव बोलत होते.
यावेळी सुनील वाघमारे म्हणाले की अडीच हजार वर्षापुर्वी भगवान गौतम बुद्धानी भारतात लोकशाहीचा पाया रचला. जगाला शांतीचा विचार दिला. हाच विचार जगातील सर्वच मोठ्या देशांमध्ये रुजला आहे. डॉ. बाबासाहेब आबेडकर हेच लोकशाहिचे प्रतिक असून त्यांनी संविधानाची निर्मिती केली आहे.
बुध्दगया येथे भगवान बुध्दांना ज्ञानप्राप्ती आली. ज्ञानच जगात श्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आबेडकर ज्ञानाचीच प्राप्ती केली म्हणून त्याना संविधान लिहिण्याचा अधिकार मिळाला. सध्या बुद्धगया येथे टेम्पल कायदा अस्तित्वात असून सदरचा कायदा रद्द करून त्या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी फक्त बौद्ध धर्मियांची नियुक्ती करण्यात यावी व सदरचे महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली.
यावेळी बाळासाहेब कसबे, दीपक चंदनशिवे, यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी दीपक चंदनशिवे, सुजितकुमार सर्वगोड, दिलीप देवकुळे, एल.एस सोनकांबळे, अंबादास वायदंडे, संतोष पवार, उमेश वाघमारे, संतोष सर्वगोड, उमेश सर्वगोड, अमित कसबे, विष्णू धाईंजे, समाधान लोखंडे, पोपट क्षीरसागर, ,विनायक मागाडे, , दादासाहेब दोडके, , जितेंद्र आठवले, गोविंद सर्वगोड, हनुमंत बंगाळे यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.