Uncategorized

आर्टीत ज्ञानज्योती सावित्रिमाई फुले यांची जयंती साजरी

फोटो ओळ- गोवंडी येथील आर्टीच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित अनिल वारे, धोडींबा नामवाड, डॉ. आम्रपाली थोरात, सायली लोमटे, विदुला मोहिते

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

संपादक -श्रीकांत कसबे

मुंबई, दि. 03 : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी येथील अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेत साजरी करण्यात आली.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मानवतेवर आधारलेल्या समाजाचे स्वप्न पाहिले. त्यासाठी शिक्षणाचा पाया रोवला. त्यामुळे शिक्षण हे स्वतःच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि अन्यायाच्या विरोधात बंड करण्यासाठी प्रेरीत करत असते. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची आजच्या काळात नितांत गरज आहे, असे मत प्रकल्प अधिकारी सायली लोमटे यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली थोरात यांनी केले तर योगीता कांबळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर अश्विनी बाबर यांनी आभार मानले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक अनिल वारे, प्रकल्प व्यवस्थापक धोडींबा नामवाड, उपलेखापाल विनायक लांघी, अक्षय जाधव, नितिन सांळुखे, पवन साळवे, अमोल तुपसुंदर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close