Uncategorized

महायुती व महाआघाडी दोन्ही आरक्षण विरोधी –सुनील वाघमारे

आता वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही

 

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-महायुती व महा आघाडी या दोन्हीने ही भारतीय संविधाना सोबत सातत्याने धोकेबाजी केली असून दोघे ही संविधाना विरोधात आहेत. यातील युती ही धर्मग्रस्त व आघाडी ही जाती ग्रस्त आहे.त्यामुळे नागरिकांना समता,स्वातंत्र्य, न्याय व बंधुता याचा पुरस्कार करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही असे स्पष्ट विचार वंचित बहुजन आघाडीचे माजी राज्य उपाध्यक्ष सुनील वाघमारे यांनी व्यक्त केले. 252 पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक माने यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले कीं, राज्यात अनेक ठिकाणी महाआघाडीनी आपल्या उमेदवरा विरोधात अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. त्याला मैत्रीपूर्ण लढत असे गोंडस नाव दिले आहे. तर काही मतदार संघात अधिकृत उमेदवारा विरोधात अपक्ष उमेदवार उभे करुन त्याचा प्रचार करीत आहेत. म्हणजेच हॆ पक्ष bjp ची “बी “टीम आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीची बदनामी करत आहेत. Obc चे आरक्षण खत्म केले असून आता sc st आरक्षण खतम करण्याचे त्यांचे नियोजन आहे. आरक्षणात उपवर्गीकरणं करुन scमध्ये फूट पाडली असून दुसरी कडे मात्र एक रहो सेफ रहो असा फसवा नारा देत आहेत. अशा या फुटीरवादी लोकांना सत्ते पासून दूर करुन वंचित बहुजन आघाडीला विजयी करण्याचे आवाहन करुन अशोक माने यांना विजयी बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा.आवाहन केले.

यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, राहुल शिंदे, रवी सर्व गोड शहराध्यक्ष अजय गाडे तालुका उपाध्यक्ष संजय सरवदे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल सरवदे पंढरपूर तालुकाध्यक्ष दीपक माने तालुका प्रसिद्धीप्रमुख संभाजी कांबळे अंकुश शेवडे चनाप्पा बोरकडे मेकप्पा मोरे अभिमन्यू आठवले रवींद्र आठवले विठ्ठल शिवशरण गुरुजी प्राध्यापक बलभीम शिवशरण शशिकांत रोकडे संतोष कांबळे प्रकाश सोनटक्के संजय ओव्हाळ विश्वास सरवदे शांतीलाल बोरकडे विलास बोरकडे कल्याण सरवदे इत्यादी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close