Uncategorized

पंढरपूर विधानसभा मतदार संघात 20 नवीन मतदान केंद्र 23 मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल-निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर (दि.18) :- भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जुलै या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केलेला आहे. त्यानुसार 252- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या नवीन, स्थलांतरीत, नावात बदलाबाबत निर्णय घेण्यात आलेले आहेत. पुर्वी मतदार संघात 337 मतदान केंद्रे होती. यात नवीन 20 वाढीव मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्यानुसार आता 357 मतदान केंद्र तयार झाली आहेत. त्याचबरोबर मतदारसंघातील 23 मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी शिरढोण, वाखरी, गादेगांव, टाकळी (2), पंढरपूर शहर (3), तावशी,घरनिकी, मंगळवेढा शहर (4), अकोले, खुपसंगी, लमाणतांडा, जित्ती, रड्डे, शिवणगी या ठिकाणी नव्याने मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
तसेच शिरढोण- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इसबावी-मोहसीन विद्यालय (2) , गादेगांव-न्यु इंग्लिश स्कुल, नवीन इमारत (2), कासेगांव (3) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कचकल वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेंद वस्ती , खर्डी (2) बीएसएनएल दुरध्वनी केंद्र, एकलासपूर (2) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रांझणी (3) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगळवेढा शहर (4)- नगरपालिका शाळा नं-5, मरवडे- जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा तसेच नंदेश्वर -(3) बाळकृष्ण विद्यालय या ठिकाणी मतदान केंद्र बदललेली आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदासंघातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्र तसेच ठिकाणात बदल करण्यात आलेले सदर मतदान केंद्र असून, मतदारांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी कोणात्याही दबावाला, प्रलोभनला बळी न पडता निर्भयपणे मतदान करुन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
000000000

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close