दिल्लीपतीं समोर हुजरेगिरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा :– नितीन बानगुडे पाटील
महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माढ्यात सांगता सभा संपन्न
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर /प्रतिनिधी:-माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माढा येथे नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन बानगुडे पाटील म्हणाले की कोरोना काळात महाविकास आघाडीने चांगले काम केले. मात्र पक्ष फोडीचे राजकारण करून महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेऊन महायुती सरकार दिल्ली पती समोर हुजरेगिरी करण्याचे काम करत आहे. सर्व प्रकल्प बाहेर गेल्याने येथील तरुण बेरोजगार झाला आहे. शेतमालाला भाव नाही.राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. महागाई वाढली आहे.
मात्र हे सरकार आश्वासन देऊन देत आहे.
त्यांना विचारा पहिल्या आश्वासनाचे काय झालं असा सवाल उपस्थित करत त्यांनी शेतकरी आत्महत्या, आरक्षण, महापुरुषांची स्मारके आणि पंधरा लाख रुपयाचं काय झालं असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. हे लोकसभेच्या निवडणुकीला दाखवून दिले आहे. आताही झुकणार नाही असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे बोलताना म्हणाले की माढ्याचा विकास अनेक वर्षांपासून झाला नाही यासाठी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणाऱ्या आणि माणसांना उभे करण्याचे काम अभिजीत पाटील यांनी केले आहे. माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना निवडून द्या असे आवाहन केले.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की राज्यात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. यामुळे मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथील जनतेने मला साथ द्यावी. असे आवाहन करत त्यांनी येथील लोक पवार साहेबांना सोडून गेले. त्यांना तिकीट नाकारल्यानंतर पवार साहेबांवर आरोप करत आहेत. जरांगे पाटलांवर आरोप केला. समाजाच्या भावना दुखावल्या. त्यांना तुम्ही मतदान करणार का असा सवाल उपस्थित करत विरोधकांकडे विकासाचे व्हिजन नाही. फक्त उसनेला म्हणजे विकास झाला अस नाही. मी कोरोना काळात आर्थिक नुकसान करून नागरिकांसाठी काम केले. बंद पडलेला कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले. मात्र समोरच्या उमेदवाराने दूध संघ बंद पाडला. दुधाचा भाव पाडला. त्याच्या जमिनी विकल्या, शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कर्ज काढून शेतकऱ्यांना देसोधडीला लावले. मात्र मी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केल्याने जनता मला साथ देत आहे. मी आमदार झाल्यावर माढ्याचा पाण्याचा प्रश्न सोडवेन, सीना माढा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करेन, माढ्यात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन. आरोग्याची, शिक्षणाची सोय तसेच युवकांसाठी प्रशस्त जिम उभारण्यात येईल, माढ्यात गणपतराव साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, युवकांना नोकरी मिळावी यासाठी एमआयडीसी उभारण्यात येईल, रस्ते चकाचक करण्याचे काम करेन, मतदार संघात सर्व ठिकाणी महापुरुषांची स्मारके उभारण्यात येतील असा विश्वास देत मी विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. ही निवडणूक आमदार पुत्राविरुद्ध शेतकऱ्यांचा मुलगा अशी आहे. ते अनेक अफवा पसरवतील मात्र येथील जनता दोघांचीही तुलना करून मतदान करेल असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे बोलताना म्हणाले की विरोधक दादांच्या पुण्याईवर निवडून देण्याची आवाहन करत आहेत तर माझ्या घराण्याने पांडुरंगाची मूर्तीचे संरक्षण केली आहे. मी कर्तृत्व सिद्ध केल आहे. म्हणून मला लोकांनी स्वीकारल आहे. येथील जनता मला सेवा करण्याची संधी देईल असा विश्वास व्यक्त करत विरोधकांनी केलेल्या टीकेचा आपल्या शब्दात समाचार घेतला.