जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :=जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जिजाऊ च्या पुतळ्याचे पूजन ॲड सुकेशनी शिर्के बागल यांच्या हस्ते व मुख्याध्यापिका आशाताईं जमदाडे, अनिताताई पवार, सुमनताई पवार शुभांगीताई भुईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, स्वागत दादा कदम, धनंजय मोरे, संदिप मांडवे, दिनकर दाजी चव्हाण, स्वप्निल गायकवाड, पुरूषोत्तम देशमुख, ॲड सत्यम धुमाळ, प्रशांत सुरवसे, नगरसेवक प्रशांत शिंदे,सतिश आप्पा शिंदे, अरूण फाळके, दिगंबर सुडके,जगदीश पवार, विनोद लटके,प्रताप चव्हाण सर,निशांत जाधव सोपान काका देशमुख इ. उपस्थित होते.
माँ साहेब जिजाऊ व सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नितीन काळे, डॉ. सिकंदर ढवळे दादासाहेब दोडके सर,सुनील वाघमारे श्रीकांत कसबे, डी. राज सर्वगोड,
बंटी वाघ यांनी सुत्रसंचलन केले, दिलीप पवार व गायकवाड सर यांनी जिजाऊ वंदना म्हणाले, ॲड सुकेशनी शिर्के बागल, सुमनताई पवार, शुभांगीताई भुईटे यांनी मनोगत व्यक्त केले आभार स्वागत कदम यांनी मानले