Uncategorized

अनिलदादा सावंत यांचा मंगळवेढा तालूक्यात प्रचार दौरा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव गावाला राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार अनिलदादा सावंत यांनी भेट दिली.भेट दिली. ग्रामदैवत सोमलींगचे दर्शन घेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी भाजप आणि युती सरकारवर रोष व्यक्त करत तीव्र भावना व्यक्त केल्या. महाविकास आघाडी सरकार असताना दुधाला 37 रुपये भाव होता. आता 27 रुपये भाव देतानाही सरकारचे हात थरथर कापत असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी सरकारवर आपला राग व्यक्त केला.

राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे मार्गदर्शनाखालीचे सरकारच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या पंचसूत्री जाहीरनाम्यात देखील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराची सुट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं सांगत, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांसमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close