पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन
24 जून पासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार पुरोगामी संघर्ष परिषद आक्रमक

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
सोलापूर:- पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँक ऑफ महाराष्ट्र मधील सफाई कामगारांना गेली 25 वर्ष हंगामी म्हणून काम करून घेऊन त्यांना सेवेत कायम न केल्याबद्दल पाठीमागून घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले प्रकरणी व व तुम्ही आंदोलन केले तर तुम्हाला कामावरून काढून टाकणार अशी धमकी दिले प्रकरणी बँक अधिकाऱ्यांची खातीने चौकशी करून त्यांना निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीॲक्ट दाखल करावा अशा विविध मागण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 21 जून पासून बेमुदत धरणे आंदोलन चालू असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.बँक ऑफ महाराष्ट्राचे एकही अधिकारी आंदोलन स्थळी न फिरकल्यामुळे तोडगा निघाला नसून 23 जून पर्यंत आंदोलनाचे ठिकाणी बँकेचे अधिकारी न आल्यास 24 जून पासून पोलीस प्रशासनाला कल्पना देऊन बेमुदत धरणे आंदोलनाचे अमरण उपोषणात रूपांतर करा असा आदेश राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिला असल्याचे राज्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख कृष्णाजी गायकवाड, प. महाराष्ट्र वरिष्ठ अध्यक्ष अविनाश कांबळे , वरिष्ठ सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब फाळके ,ग्रामीण सोलापूर जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आनंद ढावारे, मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील ताकतोडे,माढा तालुकाध्यक्ष संभाजी भडकवाड, दक्षिण सोलापूर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा कौशल्या बोराडे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.