राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची पंढरपूरमध्ये पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची आज शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये पदयात्रा मोठ्या उत्साहातसकाळी आठ ते दुपारी 1 या वेळेमध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेमध्ये कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. प्रचारार्थ आयोजित केलेल्या संपर्कदौरा आणि पदयात्रेला सरगम चौकापासून सुरुवात करण्यात आली. सरगम चौकापासून सुरू झालेली ही यात्रा पुन्हा सरगम चौकामध्ये येऊन थांबली. यामध्ये, कुंभार गल्ली, शिंदेनगर, कैकाडी महाराज मठ, दाळे गल्ली, झेंडे गल्ली, कडबे गल्ली, तेले गल्ली, कर्नल भोसले चौक आणि पुन्हा सरगम चौक असा या यात्रेचा रुठ ठेवण्यात आला होता.
या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर अभंगराव, आम आदमी पार्टीचे जील्हाध्यक्ष यम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, माजी तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना शरद जोशी पक्षाचे शिवाजी नागटिळक, यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.
पवार साहेबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अनिल सावंत यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनिल सावंत यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला असून, नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळत आहे. या पदयात्रेत हजोरोंच्या संख्येने नागरिक, महिला, विद्यार्थी सहभागी झाले होते.
सरगम चौकापासून सुरू झालेली ही यात्रा कुंभार गल्ली, शिंदेनगर, कैकाडी महाराज मठ, दाळे गल्ली, झेंडे गल्ली, कडबे गल्ली, तेले गल्ली, कर्नल भोसले चौक आणि पुन्हा सरगम चौक असा प्रवास करून संपन्न झाली.या पदयातत्रेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी विविध नागरिकांशी चर्चा केली. विविध क्षेत्रातले छोटे व्यापारी, ऑटोमोबाईल गॅरेज, पेंटिंग वर्कर्स, व्हील अलाइनमेंट दुकाने, पान टपरी, छोटे हॉटेल्स व्यवसाय, अशा अनेक व्यायसायिकांशी अनिल सावंत यांनी चर्चा करून, समस्या जाणून घेतल्या.