राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिलदादा सावंत यांना वसंतनाना देशमुख यांचा पाठिंबा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- पंढरपूर मंगळवेढा या मतदार संघातील वसंत नानांना एक मोठा गट आहे आणि कासेगाव गटामध्ये याच गटाने तालुक्यातील बरसेच निकाल याच गटातील मते निर्णायक म्हणून असतात आणि याच गटातील हुकमी ऐका शांत आणि सय्यमी नेतृत्व म्हणून ओळखत असणारे वसंत नाना देशमुख यांनी बोलल्याप्रमाणे आमच्या पैकी कोणालाही शरद पवार गटाची अधिकृत उमेदवारी मिळु द्यात त्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देऊन त्याच उमेदवाराचा प्रचार करून त्यांना मोठे मताधिक्य देऊन निवडून अनु म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य, श्री वसंत नाना देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आज ऐतिहासिक निर्णय झाला.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून भावी आमदार म्हणून अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला.