राज ठाकरे यांची बुधवारी 1वाजता मंगळवेढा येथे जाहीर सभा
मनसे उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांनी दिली माहिती


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे, यांच्या प्रचारासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मंगळवेढ्यात येत आहेत. बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी त्यांचा मंगळवेढा दौरा कायम झाला आहे. या दिवशी दुपारी एक वाजता त्यांची जाहीर प्रचारसभा पार पडणार आहे, याबाबतची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून देण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या प्रचार सभेच्या वेळेत अचानक बदल झाला असल्याची माहिती, मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्याकडून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात दिलीप धोत्रे यांची उमेदवारी दीड महिन्यापूर्वी जाहीर केली होती. राज्यात अनेक मनसेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचारदौरा राबवला आहे. पहिल्या टप्प्यातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवड केली आहे. यामुळे दिलीप धोत्रे यांची उमेदवारी चर्चेत आली आहे.




