Uncategorized
मनसेचे दिलीपबापू धोत्रे यांचेसाठी राज ठाकरे यांची 6 नोव्हेंबरला मंगळवेढा येथे जाहीर सभा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार दिनांक 6नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे सायंकाळी पाच वाजता शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे जाहीर सभा होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यानी प्रचारात आघाडी घेतली असून महाराष्ट्रात सर्वात अगोदर त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
त्यांनी प्रचाराचा धडाका चालवला असून आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे पिंजून काढत असून त्यांच्या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.