जास्तीत जास्त मतदान करुन दिलीपबापू धोत्रे यांना निवडून आणायचेच -ॲड संदीप रणनवरे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
मनसे नेते दिलीपबापू धोत्रे
पंढरपूर :-पंढरपूर.. मंगळवेढा विधानसभेची निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत आहे.. या निवडणुकीसाठी आपले सर्वांचे जिवलग मित्र दिलीप काशिनाथ धोत्रे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणूक लढवत आहेत हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. येत्या 20 नोहेंबरला आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आजपासून पुढील 30 दिवस आपण अतिशय शांतपणे आणि ठोसपणे निवडणुकीला सामोरे गेलो तर आपल्याला कोणीही रोखु शकत नाही. तरी आपला उमेदवार, आपला मित्र दिलीप बापू धोत्रे यांच्यामागे आपण ठामपणे उभे राहायचे आहे. असे आवाहन ॲड संदीप रणनवरे यांनी केले आहे.सोशल मीडियात आपण प्रत्येक जण सक्रिय असालच असं नाही परंतू सोशल मीडियाचा प्रभावी वापर आपल्याला करावा लागणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचून आपल्या मित्राबद्दल लोकांना सांगायचं आहे व जास्तीत जास्त मतदान दिलीप बापू ला करायचं आहे. तंत्रज्ञान कितीही ताकतवान असंल तरी ग्राऊंडवर आपल्याला सतर्क राहावेच लागणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण किमान 20 लोकांना सहज ओळखतो. आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि इतर माध्यमातून किमान 20 मतदारांना आपण दिलीप बापू ला मतदान करण्यासाठी प्रयत्न करू या. लक्षात घ्या विधानसभा जिंकण्यासाठी किमान 80..85 हजार मतदान आवश्यक आहे. उमेदवार त्याच्या परीने प्रचार करेल, मतदान आनेल पण आपण मित्र म्हणुन दिलीपला आमदार करण्यासाठी किमान 20 जणांकडून मतदान करून घ्यावं लागणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आणि खूप गरजेचं आहे. आपली जबाबदारी आपण पार पाडून दिलीपला पूर्ण पाठिंबा देऊ या आणि या निवडणुकीत दिलीपला भरघोस मतांनी निवडून देऊ.असे असे ही ॲड संदीप रणनवरे म्हणाले.