चंद्रकांत सातपुते सर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!
अनेक हितचिंतकांकडून अभिनंदनाचा करण्यात आला वर्षाव

पुरस्कार प्रदान करताना राज्याध्यक्ष जवंजाळ साहेब, जिल्हाध्यक्ष शशिकांत खुडे , विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये सर ,अनगर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बोराडे सर, बाळासाहेब पिसे सर, मनोज खिलारे सर, गणेश भोसले सर, ज्ञानेश्वर लेंडवे सर, गणेश शिंदे सर, श्रीकांत शिंदे सर.
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर –राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना यांचे वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तावशीचे इंग्रजी विषयाचे शिक्षक चंद्रकांत सातपुते सर यांना समारंभ पूर्वक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. चंद्रकांत सातपुते सर 2000सालापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.S.S.C.आणि H.S.C.या वर्गांना शिकविण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.पाचवी शिष्यवृत्ती,आठवी शिष्यवृत्ती, आठवी N.M.M.S.या स्पर्धा. परीक्षांचे सुद्धा मार्गदर्शन करतात.प्रशालेचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.सातपुते सरांनी पहिली ते आठवीच्या स्मार्ट पी.टी.इंग्रजी प्रशिक्षणामध्ये,नववी, दहावीच्या ब्रिटिश कौन्सिल ट्रेनिंग मध्ये ही तज्ज्ञ इंग्रजी मार्गदर्शक म्हणून काम पाहिलेले आहे.माध्यमिक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणामध्ये सुद्धा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडलेली आहे.इंग्रजी शिकविण्याच्या कुशल शैली मुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत.
याप्रसंगी जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ,तावशी या संस्थेचे अध्यक्ष धनाजी वसंत यादव, संस्थेचे सचिव बाळासाहेब धोंडिबा यादव, सर्व संचालक मंडळ व त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक अनुसे सर, पर्यवेक्षक शिराळ सर , बाळासाहेब पिसे सर , राजेंद्र आसबे सर, वरिष्ठ लिपिक बाजीराव क्षीरसागर, कनिष्ठ लिपिक सौ.भोसले-लेंडवे मॅडम, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक , विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.तसेच अनेक हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.