माता रमाई यांच्या जयंती निमित्त 15 ते 18 वयोगटातील मुली व मुलांकरीता कोवॅक्सिन लस व 18 वया पुढील सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस
भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ ,व रमामाता महिला मंडळाचा उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर-भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ ,व रमामाता महिला मंडळ, महापुर चाळ यांच्या वतीने आज
माता रमाई यांच्या जयंती निमित्त
15 ते 18 वयोगटातील मुली व मुलांकरीता कोवॅक्सिन लस
व 18 वया पुढील सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस
देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .या उपक्रमास संतपेठ महापूर चाळ,बडवे चर झोपडपट्टीतील नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या लसीकरण मोहिमेत परिसरातील 150 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

यावेळी प्रतिमेचे पूजन पंढरपुर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष
सौ.साधना ताई भोसले ,माजी उपनगराध्यक्ष सौ.श्वेता ताई डोंबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक संजय निंबाळकर, डी.राज सर्वगोड ,.कृष्णा वाघमारे, वंचित आघाडीचे पै.विकास गायकवाड,.विलास माने ,पै.माऊली काळे व मंडळाचे आधारस्तंभ उमेश सर्वगोड,सुधीर सर्वगोड, मिलींद सर्वगोड, अक्षय कदम तसेच मंडळाचे सर्व जेष्ठ मार्गदर्शक सर्व प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते





