फकीरा दल च्या वतीने सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अक्कलकोट;- 09/08/2022 अक्कलकोट येथे फकीरा दल च्या वतीने जगविख्यात सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवर शिक्षक व विद्यार्थी यांचे मनोगत व्यक्त करून संपन्न यामध्ये काशीराया काका पाटील महाविद्यालय,वरिष्ठ प्राथमिक स्कूल, प्रमिला राजे कन्या प्रशाला,मराठी मुलींची शाळा नंबर 1, तसेच जनता चाळ अण्णाभाऊ साठे नगर माणिकपेट येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला .
पुढीलप्रमाणे पारितोषक #मोठा गट#
प्रथम क्रमांक -१)प्रणाली गायकवाड( इयत्ता ९)
दुतीय क्रमांक- २)फरदीन शेख( इयत्ता १०)
तृतीय क्रमांक- ३)तुषार नडगम( इयत्ता ८)
मध्यम गट१)शुभांगी वाघमारे,२) अभिषेक शितोळे,३) वैष्णवी गायकवाड
#लहान गट#
1)योगीता धोकटे,2)ऋतिका काळजे,3)चेतन माशाळकर .
प्रथम पारितोषक-स्कूल बॅग
द्वितीय पारितोषिक -टिफिन व डझन वह्या
तृतीय पारितोषक -कंपास व वह्या
उत्तेजनार्थ -पॅड व पेन तसेच स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल पेन असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मातंग समाज अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक निवृत्ती लक्ष्मण पारखे, पंच कमिटी सदस्य मेजर अंबादास देडे, सुरेश पारखे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी काशिराया काका पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य फुलारी सर, समीर मनियार सर, चौधरी सर,सौ. अश्विनी पाटील, कुंभार सर पाटील सर
सौ. जयश्री स्वामी कवठे सर,प्रमिला राजे गर्ल स्कूल चे मुख्याध्यापक खजूरगीकर न.प.शाळा नंबर 1चे मुख्याध्यापक अंबादास हरवाळकर सर, वरिष्ठ शाळेचे अन्सारी सर, पुजारी सर,मुकणार मॅडम, बनसोडे मॅडम, जमादार मॅडम,अनिता व्हसुरे मॅडम ,वषाॅ तडकलकर,संगीता बावलती, फकीरा दल अक्कलकोट शहर प्रमुख स्वामीनाथ कांबळे,उपप्रमुख हर्षवर्धन देडे, राहुल सनके,खाजाप्पा हारवाळकर, पार्वतीआई पारखे, लक्ष्मीताई बनसोडे,रुक्मिणीताई वाघमारे आदि कार्यकर्ते शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार आयोजक फकीरा दल सोलापूर जिल्हा प्रमुख जय भाऊ पारखे यांनी केले