Uncategorized
पटवर्धन कुरोली येथे बसपाचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त व्याख्यान संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-मंगळवार दिनांक १५ अक्टोंबर २०२४ रोजी ,पंढरपूर तालुक्यातील मौजे पट कुरोली येथील , सर्व बौद्ध बांधव, बहुजन समाज यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन केले होते.,बहुजन समाज पार्टी ,सोलापूर जिल्हा प्रभारी. भालचंद्र कांबळे हॆ व्याख्याते म्हणुन उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी गावातील विद्यार्थि, युवक ,वडीलधारी मंडळी उपस्थित होती.
तसेच बसपा, बौध महासभा,चे ही पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन बसपा माढा प्रभारी औदुंबर डावरे, बापू डावरे ,विजय डावरे , शिंदे सर, अरविंद डावरे यांनी केले.
कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीत पार पडला.