Uncategorized

प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्था नातेपुते व संकल्प बहुउद्देशीय संस्था गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंताचा भव्य सत्कार सोहळा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

नातेपुते -( सुनील साळवे )दि. 20.09. 2024 रोजी प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्था नातेपुते व संकल्प बहुउद्देशीय संस्था गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंताचा भव्य सत्कार सोहळा नातेपुते येथे पार पडला. विश्वजीत अरूण आवळे यास MBBS ला प्रवेश मिळाल्या बद्दल तसेच कु. सायली अरविंद सोनवणे हिस ज्यु इंजिनिअर जि.प. पुणे येथे नियुक्ती झाले बद्दल व सौरभ किसनराव ढोबळे यास जि. प. सोलापूर येथे नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला . जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या जोरावर यांनी यशाचे शिखर पार केले आहे आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे. समाजासाठी हे सर्वजन प्रेरणादायी आहेत.


कार्यक्रमासाठी माजी .उप जिल्हाधिकारी आण्णासाहेब समिंदर , माजी वैद्यकीय अधिकारी गट 1,.डॉ.पांडुरंग नलवडे , राष्ट्रीय संत आखाडा चे मोहनानंद महाराज, आकाश युवराज वाघमारे MTech. Technology Analysist Infosys, पालक अरुण आवळे साहेब , संस्थेचे अध्यक्ष माणिकराव देठे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल साळवे सर यांनी आपले विचार व्यक्त केले.

.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राहूल भोसले खजिनदार युवराज वाघमारे जेष्ट संचालक पांडुरंग सोरटे गुरूजी ,संचालक शिवाजी साळे यांनी अथक परिश्रम घेतले. संचालीका आयु .लक्ष्मी देठे, आयुष्यमती ललिता वाघमारे,आयुष्यमती योयना निकळजे ,आयुष्यमती सुजाता भोसले यांनी महिला पकलकांचा सत्कार केला. आयुष्यमती अस्मिता आवळे ,आयुष्यमती सोनवणे ताई व पालक अरुण आवळे साहेब,अरविंद सोनवणे , तसेच किसनराव ढोबळे काशिनाथ सोनवणे तसेच विशेष पाहूणे जैन समाजाचे सक्रिय कार्यकर्ते वैभव शहा यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व प्रस्तावना संस्थेचे सहसेक्रेटरी प्रकश साळवे यांनी पार पाडले .अल्पोपहार व चहापान होऊन कार्यक्रम पार पडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close