नातेपुते येथे अनुसूचित जाती साठी उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न!


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
नातेपुते :- ( सुनिल साळवे)दि.20.09.2024 रोजी प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्था नातेपुते व संकल्प बहुउद्देशीय संस्था गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण ‘कार्यक्रम ( अनु. जातीसाठी ) पार पडला . या कार्यक्रमासाठी तुषार लुकंड साहेब उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर महाराष्ट्र राज्य व मिटकाॅनचे प्रमुख ट्रेनर चंद्रकांत लोंढे संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन विलास भोसले , राष्ट्रीय संत आखाडा परिषदेचे मोहनानंद महाराज व माजी वैद्यकीय अधिकारी गट 1 डाॅ.पांडुरंग नलवडे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी ,पात्र महिला प्रशिक्षणार्थी हजर होते. पात्र महिला प्रशिक्षणार्थींना जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर व मिटकाॅन यांच्या वतीने 30 दिवसाचे टेलरिंग प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच त्यांना प्रशस्तीपत्र व प्रशिक्षण मानधन दिले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यावसायासाठी बॅन्के कडून कर्ज मिळणार आहे परंतू त्यांनी 30 दिवसाचे प्रशिक्षण काटेकोरपणे पूर्ण केले पाहिजे व कौशल्य आत्मसात केले पाहिजे बॅन्केसाठी सिबील चांगले असले पाहिजे.




