Uncategorized

अभिजित पाटील यांनी लेझिम वर ठेका धरत घेतला आनंद

अभिजीत पाटील यांचा लेझीम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल]

 

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर /प्रतिनिधी :-

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पंढरपूर येथील सहकार गणेशउत्सव निमित्त अनेक मंडळाच्या पूजा करून भेटी देत असतात. अनेक मंडळे विविध कलाकृती सादर करत असताना अभिजीत आबा पाटील यांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेत उपस्थितांची मने जिंकली.

 

कमी कालावधीत कामाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात एक नवा चेहरा म्हणून अभिजीत आबा पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अभिजीत पाटील यांनी वेळात वेळ काढून पंढरपुरातील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या सहकार मंडळातील कार्यकर्त्यांसोबत लेझीमवर ठेका धरला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत अभिजीत पाटील यांनी ढोल-ताशांच्या तालावर अतिशय सुंदर ठेक्यावर लेझीम खेळताना दिसून आले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना अभिजीत पाटील यांनी पंढरपूर शहरात देखील सर्व गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टेज टाकण्यात आले आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली आहे.
विविध सार्वजनिक मंडळांनी गणपती बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ढोल पथक, लेझीम पथक यासह विविध खेळ, कलापथकाद्वारे सामाजिक संदेश दिला जात आहे. मिरवणुकीत आकर्षक रथ ,विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास तयार करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close