शालेय खो-खो स्पर्धेमध्ये जुनोनी माध्यमिक विद्यालय,जुनोनी संघास विजेतेपद


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
मंगळवेढा प्रतिंनिधी: दि.21/08/2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील यशवंत मैदानावर पार पडलेल्या शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षे वयोगटामध्ये जुनोनी माध्यमिक विद्यालय जुनोनी संघाने सेमी फायनल सामन्यामध्ये शिरनांदगी संघाचा 1 डाव 4 गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना हा जुनोनी माध्यमिक विद्यालय, जुनोनी विरुद्ध तळसंगी या अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये पहिल्या डावात जुनोनी संघाने तळसंगी संघावर 3 गुणांची आघाडी घेतली. यामध्ये जुनोनी संघाचे खेळाडू कु.रेणुका माने हिने तडफदार 5 मिनिटे 30 सेकंद संरक्षण करीत सिंहाचा वाटा उचलला. तसेच कु.पूनम करे , ऋतिका कांबळे , रिजवाना शेख , यांनी महत्वाची कामगिरी करीत जुनोनी संघाने तळसंगी संघाचा 7 गुणांनी पराभव करीत सामन्यात वर्चस्व मिळविले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक व युटोपियन शुगर्सचे (स्टोअर अकौंटंट) सुनील पुजारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे क्रीडा शिक्षक- . बंडगर सर, मार्गदर्शक .पाच्छापुरकर सर, पवार सर,राहुल सर यांचेसह प्रशालेचे मुख्याध्यापक . सिद्धेश्वर इंगोले सर व जुनोनी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.




