बँड व बेंजो कार्यक्रमाला आडवू आणू नका– अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिष्टमंडळा समोर दिले पोलिसांना आदेश

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने साताऱ्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक बोऱ्हाडे यांना निवेदन देताना महामंत्री मारुतीराव बोभाटे, प्रदेश कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, बँड बॅन्जो आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयभाऊ सावंत
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा:- पुरोगामी संघर्ष परिषदेने गेल्या वर्षी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाँकडाऊन मध्ये बँड बेंजो कार्यक्रमावर कसलेही निर्बंध नसताना पोलिसानी विनाकारण बंदी घालू नये म्हणून आमरण उपोषण केले होते त्यावेळी जिल्हाधिकार्यांनी बँड बेंजोचे कार्यक्रमावर कसलेही निर्बंध नाहीत कार्यक्रम करा असे सांगितले असताना सुद्धा सातारा जिल्ह्यातील पोलिस विनाकारण कार्यक्रमांमध्ये चिरीमिरीसाठी आडकाठी आणत असल्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाने आज साताऱ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले असता पोलीस अधीक्षक बोऱ्हाडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिसांना कोरोना चे नियम पाळून बँड बँजो कार्यक्रमास परवानगी द्या त्यांना कुठेही अडवू नका असे सक्त आदेश दिल्याने इथून पुढे पोलिसांनी बँड व बँजो कार्यक्रमास बंदी घातल्यास पुरोगामी संघर्ष परिषदेचे बंँड बॅन्जो आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयभाऊ सावंत, राज्याचे महामंत्री मारुतराव बोभाटे व राज्याचे कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे यांचेशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.