Uncategorized

आद्य वीरशैव महिला मंडळ व मनसे ॲग्रो इंडस्ट्री लि.यांच्या संयुक्त विद्यमाने दिपावली खरेदी एक्स्पो

पंढरपूर  प्रतिनिधी– 
पंढरपूर शहरातील महिला आर्थिक बाबतीत सक्षम व्हावेत म्हणून आद्य वीरशैव महिला मंडळ व मनसे ॲग्रो इंडस्ट्री लि.यांच्या संयुक्त विद्यमानाने हा एक्सपो भरवला आहे.आज सायंकाळी थाटात उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे.
मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ते म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील व पंढरपूर शहरातील महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी मनसे व आद्य वीरशैव महिला मंडळ यांच्यातर्फे आयोजित हा उपक्रम असून दिपावलीच्या सणानिमित्त सर्व सामान्य जनता ही सणाची खरेदी करत असते.या सणाची खरेदी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित केले आहे.
स्टॉलची जागा  महिलांच्या साठी मोफत ठेवले आहे.या स्टॉल मधून विविध प्रकारच्या दिपावलीच्या वस्तू,दिवे,पणती,उटणे, आकाश कंदील,दिपावलीचे गोडधोड पदार्थ, तसेच रेडीमेड कपडे,विविध प्रकारच्या वस्तू व खाद्य पदार्थ,इमिटेशन ज्वेलरी, महिला व युवती साठी माफक दरात साडी ड्रेस,आदी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
 या स्टॉल वरुन लोकांनी खरेदी करावी.जेणे करुन महिलांना आर्थिक बाबतीत लाभ होईल.महिला आर्थिक बाबतीत सक्षम झाल्यास त्या आपले कुटुंब व्यवस्थीत चालवू शकतात.महिलांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‌तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील लोकांनी या ठिकाणी येऊन खरेदी करावी असे आवाहन मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केले.
यावेळी उपस्थित माजी नगरसेवक महंमद उस्ताद, मनसेचे नेते शशीकांत पाटील, संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर,संजय बंदपट्टे आदी उपस्थित होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close