Uncategorized

समाज सेवक विठ्ठल वाघमारे यांचे तर्फे वारकऱ्यांना 3दिवस महाप्रसादाचे वाटप

समाज सेवक विठ्ठल वाघमारे यांचे तर्फे वारकऱ्यांना 3दिवस महाप्रसादाचे वाटप

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वाघमारे यांचे वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौक संतपेठ येथे दिनांक 16,17, व 18 जुलै रोजी आषाढी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद व पाण्याची बाटलीचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. मंगळवार दिनांक 16रोजी पुरी भाजी व दिनांक 17रोजी साबुदाणा खिचडी केली व पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले. तसेच दिनांक 18रोजी मसाला भात वाटप करण्यात येणार आहे.

विठ्ठल वाघमारे यांचे वडील महादेव वाघमारे हें माळकरी असून गेली 25वर्ष ते वारकऱ्याची सेवा करीत असून त्यांचा वारसा त्यांचा मुलगा विठ्ठल यांनी पुढे चालवीला आहे. विठ्ठल वाघमारे यांचे चुलते नानासाहेब वाघमारे, अशोक वाघमारे हें सुद्धा माळकरी असून सर्वजण वारकऱ्यांची सेवा निष्ठने सेवा करतात.

महाप्रसाद वाटपचे नियोजनासाठी माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे, सुधीर रणदिवे, सदाशिव वाघमारे सतीश वाघमारे,जॅकी वाघमारे , विनोद वाघमारे, शैलेश आगावणे, यांची मोलाची मदत आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close