प्रा.डाॅ.वामन साळवे यांचे मुंबई विद्यापीठाच्या बुद्ध आणि विपश्यना पदवीका परिक्षेत यश


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पुणे दि २१ : यशोदा माहिती अधिकार व प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रा.डॉ.वामन निंबाजी साळवे यांनी मुंबई विद्यापीठाच्या Advance Diploma in Buddist studies and Vipassana Theory and Practices दोन वर्षीय कोर्स
परिक्षेत यश संपादन केले आहे. यशोदा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: खंडूअण्णा गव्हाणे यांनी डॉ. साळवे सरांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच या कोर्सचा आपल्या संस्थेला संस्थेतील सभासद कार्यकर्ते यांना याचा कसा उपयोग होईल त्या नुसार प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. असे संस्थापक अध्यक्ष खंडुआण्णा यांनी सांगितले.
राग, द्वेष,मोह हे मानवी विकार व अकुशल कर्म असून ते दूर करून कुशल कर्म कसे आत्मसात करावे तसेच मैत्री,करुणा,मुदीता, उपेक्षा , प्रज्ञा , एकात्मता , समाधी, दहा पारमिता, अष्टांगिक मार्ग, बुद्धांनी दिलेला शांतीचा व कल्याणकारी मार्ग इत्यादी घटकांचा अभ्यास या विपश्यना कोर्स मधून शिकण्यास मिळाले. प्रज्ञा,शिल, करुणा, सत्य मैत्री, दान, बंधुता उपेक्षा , शांती,दया, इत्यादी गुण आत्मसात केल्यास माणूस कसा परीपूर्ण जीवनात यशस्वी होतो इत्यादी संबंधीच्या अभ्यासामुळे
माझ्या ज्ञानात भर पडून जीवनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. असे प्रा.डॉ.वामन साळवे यांनी आपले मत व्यक्त करते वेळी सांगितले.!



