विनर्स कोचिंग क्लासेस मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न!

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
कासेगाव :-विनर्स कोचिंग क्लासेस कासेगाव तालुका पंढरपूर मध्ये गेल्या दहा वर्षापासून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी या कोचिंग क्लासेस चा इयत्ता दहावीत कासेगाव मध्ये प्रथम क्रमांक आला. तर इयत्ता आठवी NMMS या स्पर्धा परीक्षेमध्ये या क्लासेसचे कासेगाव मध्ये सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर काही विद्यार्थी 60,000 रू.शिष्यवृत्तीसाठी तर काही विद्यार्थी 38,400 रू.सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले.
विनर्स क्लास मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये वकृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,गायन स्पर्धा, डान्स स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी या क्लासमध्ये एक आगळावेगळा उपक्रम म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रात्रभ्यासिकेची व्यवस्था व आदर्श विद्यार्थी पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ट्रॉफी व मेडल असे आहे.तसेच या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण व इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि NMMS स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ कासेगाव मध्ये संपन्न झाला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व विद्यार्थी पालक मार्गदर्शन शिबिरामध्ये क्लासच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये भरभरून क्लासचे व क्लासच्या शिक्षकांचे कौतुक केले.तसेच पालकांनीही आपल्या मनोगत मध्ये विनर्स क्लास हा तालुक्यातील नंबर एकचा क्लास असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गजानन गायकवाड सर होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.श्रुती देशमुख या विद्यार्थिनी केले .तर अध्यक्ष निवड इयत्ता दहावी मधील अभिषेक चटके यांनी केले त्याला अनुमोदन सुचित डांगे या विद्यार्थ्यांनी दिले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सद्गुरु भागानगरे या दहावीतील विद्यार्थ्यांनी केले .तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी कु. तनुजा डोईफोडे, कु.समीक्षा खिलारे ,कु. मयुरी कोळी ,कु.शर्वरी इंगोले ,कु. संस्कृती खिलारे यांनी केले या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.